प्रवाशांचा न्यायह्क्कासाठी एक चळवळ

शब्दांनाही कोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात;
केवढं आपलं भाग्य असते जेव्हा ती आपली असतात.

 

सोलापुर पुणे प्रवासी संघटना स्थापना १९.०८.२००८ ला करण्यात आली. सोलापुर, पुणे, पंढरपूर,केम,कुर्डुवाडी,माढा ,मोहोळ,पास धारक व प्रवासी यांच्या अडचणी सोडवन्या करीता संघटना स्थापन करण्याचे मुख्य कारण आहे. रेलवे पशासन व प्रवासी याच्यात स्नमय साधणे हे महत्वाचे उद्दीष्ट होते ते आम्ही साध्य केले आहे.व यापुढे प्रवास्याच्या अडचणी सोडवन्याबाबत आम्ही कटीब्द आहोत. आमची संघटना प्रवाश्याची सुरशीतता व सुखाने प्रवास करता यावा याची सूचना देत असते व तसेच सामाजीत उपक्रम ही करत असते.

अध्यक्ष                        :-  संजयदादा टोणपे   
कार्याध्यक्ष                    :-  मुकुंद बोकेफोडे   
सचिव                          : - महावीर शहा
उपाध्यक्ष                      : - श्रीनिवास बागडे, दीपक ढवाणसर ,प्रविन चौरे (माढा)
सहसचिव                      :-  जाफर पठाण
खजीनदार                     :- प्रमोद बळे  
सह खजीनदार                :- विजयकुमार चांदणे
प्रसिध्यी प्रमुख                :-  दर्शन शिरसकर,शफिक शेख  
कायदेशीर सल्लागार        :- अँड सुरेश उमराव बागल (अँडव्होकेट व नोटरी भारत सरकार )
 

 

News

14/03/2012 16:03
केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी संसदेत आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडायला सुरवात केली आहे. त्रिवेदींनी रेल्वे सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं आहे. जान है तो जहाँ है हे आमचे ब्रीद वाक्य असेल असं ते म्हणाले.   येत्या पाच वर्षात रेल्वे अपघात कमी...
14/03/2012 12:22
नवी दिल्ली। दि. १३ (वृत्तसंस्था) रेल्वे अर्थसंकल्पात दरवाढ होण्याची शक्यता नाही. प्रवासी दरवाढ आणि मालभाड्यामध्ये वाढीची शक्यता नसली, तरी उच्च श्रेणीतील प्रवासाकरिता सुरक्षाकर लावण्यात येईल, असे संकेत उद्या सादर होणार्‍या रेल्वे बजेटच्या पार्श्‍वभूमीवर मिळत आहेत. रेल्वेने बजेटपूर्वीच ६...
13/03/2012 15:57
महाराष्ट्र शासनाने रेल्वे मंत्रालयाला शिफारस केलेल्या एकूण ३५ रेल्वे प्रकल्पांची कामे निधीअभावी मागील १५ वषार्ंहून अधिक काळ रखडली आहेत. येत्या रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पांपैकी किती प्रकल्पांना पुरेसा निधी मिळेल आणि रखडलेले किती प्रकल्प मार्गी लागतील याकडे सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे....
13/03/2012 15:44
आधुनिकीकरणासाठी साडेपाच लाख कोटींची गरज नव्या सहस्रकाने जगाच्या प्रगतीचा वेग वाढविला असला तरी भारतीय रेल्वे मात्र मरगळलेलीच आहे. रेल्वेची कार्यक्षमता दिवसागणिक घटत चालली असून  सुरक्षा व्यवस्थाही ढासळत आहे. प्रवासी तसेच मालवाहतुकीतून मिळणाऱ्या राष्ट्रीय महसुलातील रेल्वेचा वाटा कमालीच घसरला...
13/03/2012 15:43
महाराष्ट्र सरकारने ५० टक्के हिस्सा उचलण्याचे मान्य केलेल्या पाच रेल्वेमार्गासह रेल्वेमार्गाचे रूंदीकरण, दुहेरीकरणासारख्या एकूण ३५ प्रकल्पांसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस पाठवलेली असून यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात तरी महाराष्ट्राला न्याय मिळतो काय याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे....
13/03/2012 15:35
 वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोघा विद्यार्थ्यांच्या 46 हजार रुपयांचे साहित्य असणाऱ्या बॅगा गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्‍सप्रेस (11040) मधून आज पहाटे चोरीस गेल्या. मीना प्रमोद सांगळे (वय 18, रा. एरंडोल, जि. जळगाव) आणि निखिल अनिल भालेराव (18, रा. अमळनेर, जि. जळगाव) अशी त्यांची...
12/03/2012 15:44
प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. येत्या अर्थसंकल्पात सोलापूर विभागात मोहोळ-भिगवण दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळावी, इलेक्‍ट्रिेफिकेशन कामांना प्रारंभ व्हावा, विजापूर-मुंबई गाडी रोज सोडावी, अशी अपेक्षा प्रवासी संघटना व...
08/03/2012 11:52
कऱ्हाड - पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या प्रस्तावित कऱ्हाड- चिपळूण रेल्वेसाठी होणाऱ्या एकूण खर्चापैकी 50 टक्के रक्कम राज्य शासन स्वतः देणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. सुमारे 112 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 928 कोटी रुपये अंदाजे खर्च...
05/03/2012 10:58
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - रेल्वेचे उत्पन्न घसरत असल्याचे कारण पुढे करत वातानुकूलित श्रेणी प्रवासाच्या भाड्यात 10 ते 12 टक्के वाढ करण्याचे सूतोवाच केंद्रीय वित्त विभागाकडून मिळत आहेत. गेली आठ वर्षे रेल्वेने प्रवासी भाड्यात वाढ केलेली नाही. मात्र आता रेल्वेचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने...
05/03/2012 10:57
केवळ जनतेला आवडणार नाही म्हणून रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ न करण्याचा अविचारी निर्णय सरकारकडून घेतला जात आहे. मात्र, सातत्याने तोट्यामुळे गटांगळ्या खाणाऱ्या या "सक्षम' खात्याच्या कारभारात सुधारणा कधी होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पा च राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर आता...
03/03/2012 10:04
मिरज - कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्‍स्प्रेस (क्रमांक 27416) आज मध्येच बंद पडली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे दोन तास ती रुळावरच खोळंबली होती. यादरम्यान मिरज-बेळगाव मार्गावरील अन्य गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या. रेल्वेच्या प्रवासात इंजिन मध्येच बंद पडण्याचा प्रकार...
01/03/2012 17:11
प्रस्तावित प्रकल्पानुसार दौंड ते गुलबर्गा या 224.9 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाचे दुहेरीकरण आणि पुणे- दौंड- गुंटकल या 664 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाच्या विद्युतीकरणासाठी 1437.79 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड आशियाई विकास बॅंकेकडून कर्ज...
01/03/2012 17:02
पुणे - संपूर्ण देशाला जोडणाऱ्या भारतीय रेल्वेच्या नकाशावर महाराष्ट्राचे स्थान आजही शोधावे लागते. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला आणि पर्यटनापासून ते औद्योगिक व कृषी मालाच्या वाहतुकीत अग्रेसर असणाऱ्या उर्वरित महाराष्ट्राला विकासात पुरेसा वाटा न देण्याची रेल्वेची परंपरा आहे. महाराष्ट्रातील रेल्वेच्या...
01/03/2012 16:54
केंद्राच्या अखत्यारीतील रेल्वे खात्याने महाराष्ट्राच्या हाती नेहमीच उपेक्षेचे तिकीट टेकवले. भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या मुंबई, पुण्यापासून ते देशाचे मध्यवर्ती केंद्र असणाऱ्या नागपूरपर्यंत; रेल्वेने कोणत्याच शहराला "फर्स्ट क्‍लास' दर्जाचे काम केलेले नाही. महाराष्ट्राची ही उपेक्षा यंदाच्या...
01/03/2012 13:53
कोल्हापूर - कोल्हापूर ते गोवा प्रवास कधीच कंटाळा न येणारा; पण हाच प्रवास झुकझुकगाडीतून करता आला तर तो अधिकच आनंदी ठरणारा. आता प्रवासाचा हा आनंद घेता येणार आहे. कारण कोल्हापूर ते मडगाव (गोवा) ही उन्हाळी स्पेशल रेल्वेसेवा 15 मार्चच्या दरम्यान सुरू होणार आहे. सुरवातीला आठवड्यातून एकदा असणारी...
16/02/2012 11:22
कुर्डुवाडी । दि. 9 (वार्ताहर) कुर्डुवाडी- लोहमार्ग पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे रेल्वेवरील दरोडा टळला. बुधवारी रात्री पावणेनऊच्या दरम्यान भाळवणी स्टेशन आऊटरच्या डाऊन वायरची केबल कोणीतरी तोडली, हा रिपोर्ट स्टेशन मास्तराकडून कळताच रेल्वे पोलीस कर्मचारी राजू काळे यांनी लोहमार्ग पोलीसचे पो़नि़ रमेश...
16/02/2012 11:11
कुर्डुवाडी। दि. 11 (वार्ताहर) शहरात सध्या वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, छोटे-मोठे अपघात वाढत आहेत. पार्किगची सोय नाही, गावठाणाची कमतरता, जागोजागी असलेली अतिक्रमणे, दुचाकीस्वारांवर पोलिसांचे नियंत्रण नाही. यामुळे सारेच निर्ढावले आहेत. यात नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. जीप, बोलेरो अशा...
16/02/2012 11:08
कोल्हापूर। दि. 15 (प्रतिनिधी) रेल्वेखाली सापडून जवान ठार झाला. नीलेश रामचंद्र सावंत (वय 24, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे. टेंबलाईवाडी रेल्वे फाटकाजवळ आज दुपारी ही घटना घडली. रेल्वे पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. सावंत हे 2006 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती...
16/02/2012 11:04
मुंबई। दि. १३ (प्रतिनिधी) टेक्नोसेव्हि लोकांपूर्तीच र्मयादीत न राहता सर्वसामान्यांचे आकर्षण ठरलेल्या फेसबुकवर आता चक्क रेल्वे तिकीटांच्या आरक्षणासह गाड्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. सध्या रेल्वेच्या दिल्ली विभागात प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू झाली आहे. फेसबुक, ट्विटर या सोशिल नेटवर्किंग...
08/02/2012 15:56
प्रतिनिधी , मुंबई रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण करण्याच्या कालावधीची मुदत तीन महिन्यांवरून प्रायोगिक तत्त्वावर चार महिने करण्याचा निर्णय रेल्वेमंत्रालयाने घेतला आहे. १० मार्च २०१२ पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. अर्थात छोटय़ा अंतरासाठी दिवसा धावणाऱ्या ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस यासारख्या...
08/02/2012 15:55
विशेष प्रतिनिधी , मुंबई राज्यभरातील एसटीच्या सर्व चालकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन गंभीर आजार असलेल्या चालकांना अन्य काम दिले जाणार आहे. त्यासाठी आरोग्य तपासणीची विशेष मोहीम ११ फेब्रुवारीपासून राबविली जाणार असून सर्व अहवाल एसटीच्या मुख्य...
08/02/2012 15:51
ठाणे। दि. ७ (प्रतिनिधी) सोमवारी शहाड-आंबिवली रात्री उशिराने स्थानकांदरम्यान डाऊन दिशेकडे ट्रॅक डाऊनच्या घटनेमुळे चाकरमान्यांना त्रास झाला असतानाच मंगळवारी सकाळीही जलद मार्गावरील अंबरनाथ लोकल डाऊन दिशेकडेच दिवा स्थानकांदरम्यान अचानक फेल झाल्यामुळे मध्य रेल्वेची डाऊनची वाहतूक...
06/02/2012 15:57
प्रतिनिधी , मुंबई सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मरिन लाइन्सजवळ ओव्हरहेड वायरमध्ये कावळा अडकल्याने ही वायर तुटून लोकल वाहतुकीचा बोऱ्या वाजला. काही गाडय़ा रद्द झाल्याने आणि वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू असल्याने सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सकाळी...
06/02/2012 14:17
नवी दिल्ली - रेल्वे प्रवासासाठी इंटरनेटद्वारे केलेल्या आरक्षणाचा "एसएमएस' इलेक्‍ट्रॉनिक तिकीट (ई-तिकीट) म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. आरक्षणानंतर "प्रिंटआउट' बाळगण्याच्या कटकटीपासून प्रवाशांची मुक्तता होणार...
05/02/2012 14:27
सोलापूर। दि. 4 (प्रतिनिधी) मध्य रेल्वेतील सोलापूर विभागात विविध ठिकाणी वारंवार पडणारे रेल्वेवरील दरोडे, प्रवाशांना लुटण्याचे वाढलेले प्रकार, दगडफेकीचे प्रकार याबाबत, प्रवाशांना सुरक्षा देण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी पोलिसांची संख्या कमी आहे, देशभरात अनेक ठिकाणी अशा घटना रेल्वेबाबत...
05/02/2012 11:38
सोलापूर। दि. 4 (प्रतिनिधी) मध्य रेल्वेतील सोलापूर विभागात विविध ठिकाणी वारंवार पडणारे रेल्वेवरील दरोडे, प्रवाशांना लुटण्याचे वाढलेले प्रकार, दगडफेकीचे प्रकार याबाबत, प्रवाशांना सुरक्षा देण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी पोलिसांची संख्या कमी आहे, देशभरात अनेक ठिकाणी अशा घटना रेल्वेबाबत...
20/01/2012 12:58
सोलापूर। दि. 19 (प्रतिनिधी)               करमाळा तालुक्यातील केम येथे गुरुवारी रात्री हुतात्मा एक्स्प्रेसवर दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी दगडफेक केल्याने दोन प्रवासी किरकोळ जखमी...
19/01/2012 15:32
मिरज - गोवा-निजामुद्दीन एक्‍स्प्रेसच्या जनरल बोगीमध्ये काल रात्री आग लागली. कर्मचाऱ्यांनी पंधरा मिनिटांत ती आटोक्‍यात आणली. या प्रकाराने रेल्वे सुटण्यास अर्धा तास उशीर झाला. गोव्याहून निजामुद्दीनला निघालेली एक्‍स्प्रेस (क्रमांक 12779) रात्री साडेदहा वाजता मिरजेत आली. गाडीला येथे दहा...
18/01/2012 15:10
नाशिक मध्य रेल्वेच्या नाशिक-मुंबई मार्गावर गुरूवारी सकाळी मालवाहू गाडीचे २० डबे घसरल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक  पूर्णपणे विस्कळीत झाली. दिवसभरात या मार्गावरून धावणाऱ्या जवळपास ५६ रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडून पडले. काही रेल्वेगाडय़ा रद्द करतानाच रेल्वे प्रशासनाने लांब...
15/01/2012 11:38
सोलापूर - थेनच्या चक्रीवादळानंतर थोडीशी विश्रांती घेतलेली थंडी पुन्हा वाढत असून, त्यामुळे सोलापूरकर गारठून जात आहेत. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच तापमान 12 अंश सेल्सिअसवर आले होते. त्यानंतर "थेन' नावाच्या चक्रीवादळाने तमिळनाडूत धुमाकूळ घातला. त्याचा परिणाम होऊन थंडी काही प्रमाणात कमी झाली...
12/01/2012 17:33
सोलापूर। दि़ 4 (प्रतिनिधी) लाचप्रकरणात पोलिसांबरोबर पोलीस निरीक्षकास अटक झाल्याने लोहमार्ग पोलिसांचा बुरखा फाटला आहे. चोरीच्या तपास प्रकरणात ताब्यात घेतलेली मोटरसायकल, मोबाईल हँडसेट, पैसे परत करण्यासाठी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पो. कॉ. कोकणी याने तक्रारदारास 50 हजार मागितले....
12/01/2012 17:21
बार्शी। दि. 10 (प्रतिनिधी) श्रीपतपिंपरी फाटय़ावरील रेल्वे गेटजवळ मुंबई-लातूर या सुपर फास्ट रेल्वेच्या धडकेत टीपरचालक सतीश रामहरी ताकभाते (वय-47, रा. श्रीपतपिंपरी, ता. बार्शी) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे 5 वाजता घडला. क्र.एम.एच.13 ए.एक्स.206 या टीपरचा चालक आज...
12/01/2012 17:19
दि.10 (नंदुरबार) रेल्वे रुग्णालय युनिटमध्ये पुरेसा औषधसाठा असला तरी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रेल्वेतील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होतात. हा प्रकार सातत्याने गेल्या 13 वर्षापासून सुरू आहे. विशेष म्हणजे कायम वैद्यकीय अधिकारी नसल्याचा फटका रेल्वे कर्मचा:यांना बसला असून,...
12/01/2012 17:18
मुंबई, दि. ११ - देशातील दुस-या क्रमांकाचे सुशिक्षितांचे शहर म्हणून मान मिळालेल्या डोंबिवली शहरात गेल्या वर्षभरात रेल्वे अपघातात १६० जण ठार झाले आहेत. रेल्वे अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीत २०११ या वर्षात रेल्वे अपघातात १६० जण मृत्यूमुखी पडले असून १७३ जण जखमी झाले आहेत. गेल्या पाच...
02/01/2012 15:16
सोनिपत - खासगी ट्रॅव्हल्सच्या बसगाड्यांमध्ये एकेकाळी टीव्ही असण्याचे अपू्रप होते. ते दिवस आता इतिहासजमा झाले असले तरी रेल्वे खात्याने प्रवाशांच्या मनोरंजनासाठी शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये टीव्ही बसवण्याची योजना पूर्णत्वास नेली आहे. नव्या वर्षात रेल्वेने ही सुविधा प्रवाशांना भेट दिली असून,...
27/12/2011 15:18
  इंदोर - भारतीय माणसाला घरातून बाहेर पडल्यापासून ते पुन्हा घरी पोहोचेपर्यंत पाच वेळा फसवले जाते, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण परिषदेने हे सर्वेक्षण केले आहे. या रोजच्या फसवणुकीत सर्वांत मोठा हात (सुमारे 50 कोटी रुपये) रेल्वेतील पँट्रिकारचा आहे....
26/12/2011 17:41
कुर्डूवाडी। दि. 25 (वार्ताहर) झालेला तंटा मिटवू म्हणून बोलावून मागील भांडणाचा राग मनात धरून मारहाण केल्याची घटना लेंगरे वसाहत कुडरूवाडी येथे शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. यात फिर्यादी अमोल राजेंद्र फडतरे व अतुल राजेंद्र फडतरे हे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्याद...
19/12/2011 17:31
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज दिवसभर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे राज्यातील आगारात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. विशेष म्हणजे, सुट्टी घेऊन कर्मचारी आगारात उपोषणाला बसले होते. सरकारने कर्मचार्‍यांच्या प्रश्नाविषयी अंतिम तोडगा दिवसभरात...
14/12/2011 13:10
मुंबई, १३ डिसेंबर / प्रतिनिधी हार्बर गाडय़ांचे वेळापत्रक गेल्या एका आठवडय़ापासून विस्कळीत झाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी आज रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात हार्बरच्या उपनगरी गाडय़ा रोखून धरल्या. या प्रकारामुळे केवळ हार्बरच नव्हे तर मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रकही कोलमडल्याने...
15/11/2011 14:39
सोलापूर। दि. 12 (प्रतिनिधी) नागरकोईल एक्स्प्रेसवर पडलेल्या दरोडाप्रकरणी एका संशयितास रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी वाकाव येथे शुक्रवारी रात्री अटक केली. नागरकोईल एक्स्प्रेसवरील दरोडय़ाच्या प्रकारानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त के. के. शर्मा, सहआयुक्त एम. एम. मुडगरे यांनी वाकाव ते माढा...
12/11/2011 12:27
नवी दिल्ली - आता रेल्वेचे तिकिट दर वाढणे ही एक कायमस्वरूपी प्रक्रिया होणार आहे. जसजसे इंधनाचे दर वाढतील, तसतसे रेल्वेचे तिकिटाचे दरसुद्धा वाढणार आहेत. त्याचबरोबर तत्कालमध्ये तिकिट काढायचे असल्यास, ते आता प्रवासाच्या एक दिवस आधी काढावे लागणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी...
12/11/2011 12:25
ठाणे। दि. ९ (प्रतिनिधी) कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर उभ्या असलेल्या कल्याण-सीएसटी या लोकलचा कल्याण दिशेकडील प्रथम श्रेणीच्या मागच्या डब्याच्या मोटर कोचमध्ये आज दुपारी १२.३0 च्या सुमारास शॉर्टसर्कीटने स्पार्क झाला. त्यामुळे ही लोकल स्थानकातच रद्ध करण्यात आली. सुदैवाने या लोकलमध्ये...
12/11/2011 12:23
सोलापूर। दि. 10 (प्रतिनिधी) नागरकोयल व हैदराबाद एक्सप्रेसमध्ये दरोडय़ाची घटना ताजी असतानाच यशवंतपूर एक्सप्रेसमध्येही तरुणास लुटल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अहमद महेबूब मोमीन (वय 19, रा. गुलबर्गा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 11 तरुणांविरूद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा...
12/11/2011 12:20
नवी दिल्ली। दि. ११ (विशेष प्रतिनिधी) येत्या दोन-तीन दिवसांत २६ नव्या गाड्या सुरू होत आहेत. ८ गाड्यांचा टप्पा वाढविण्यात आला आहे तर ५पैकी ४ गाड्यांच्या फेर्‍यांची संख्या वाढवून दररोज करण्यात आली आहे. हे बदल येत्या ८ ते १0 दिवसांत होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी...
09/11/2011 12:01
सोलापूर। दि. 6 (प्रतिनिधी) रेल्वे डाक सेवा विभागाचा बेमुदत बंद सुरू असून, रविवारी चौथ्या दिवशीही कामकाज बंद होते. सोलापूर आरएमएसमध्ये शंभर टक्के बंद असल्याचे कर्मचा:यांनी सांगितले. कार्यालय बंद करणे, रेल्वेमार्फत होणारी टपाल वाहतूक बंद करणे व खासगी ट्रान्सपोर्टला देण्याचा हेतू आहे. त्यामुळे तीन...
09/11/2011 11:59
पंढरपूर। दि. 7 (प्रतिनिधी) 'हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा। गुण गाईन आवडी। हिच माझी सर्वगोडी।। नलगे मुक्ति धनसंपदा। संतसंग देई सदा। तुका म्हणे गर्भवासि। सुखे घालावे आम्हासी।।' कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोप:यांतून आलेल्या दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी आपला...
08/11/2011 18:14
उस्मानाबाद - पंढरीतून थेट शिर्डीला जाण्याची सोय होणार आहे. पुणे-मुंबईला जाणार्‍या प्रवाशांचा रेल्वे वाहतुकीवर वाढता ताण आहे. ’ सिद्धेश्‍वर एक्स्प्रेस’ ला वाढीव ३ कोच, याबरोबरच उस्मानाबादकरांसाठी लातूर-कुर्डुवाडी आणि तेथून कुर्डुवाडी -मिरज अशा दोन नवीन पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव...
08/11/2011 18:13
परभणी: लातूर-कुर्डुवाडी रेल्वेमार्गाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही रेल्वेचे विभागीय प्रबंधक ए. के. प्रसाद यांनी दिली.  मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटना व वारकरी मंडळाच्या शिष्टमंडळाने सोलापूर विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना निवेदन दिले. त्या वेळी विभागीय प्रबंधक ए. के. प्रसाद यांनी...
08/11/2011 18:00
नगर - निंबळक रेल्वे गेट परिसर म्हणजे ‘सुसाईड स्पॉट’ बनले आहे. या भागात आत्महत्या करणा-यांचे प्रमाण लक्षणीय आहे. आत्महत्यांप्रमाणेच अपघातांचे प्रमाण जास्त आहे. येथील अरुंद गेट अपघातांना निमंत्रण देते. नगर ते निंबळक या रेल्वेमार्गावर वर्षभरात किमान दहाजणांचा अपघाती मृत्यू होतो. यापैकी 5-6 घटना...
08/11/2011 17:55
नवी मुंबईहून मुंबई-ठाण्याच्या दिशेनं निघालेल्या चाकरमान्यांना आज सकाळी हार्बर रेल्वेनं चांगलाच दगा दिला. सकाळी साडेसहाच्या सुमारास, सी-वुड ते बेलापूरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं दोन्ही मार्गांवरची वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती. आता ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तीन दिवसांचा...
<< 1 | 2 | 3 | 4 | 5 >>

 

सर्व सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!! 

सचिव

महावीर शहा

ब्लॉग

www.mahavir1975.webnode.com

कुर्डुवाडी रेल्वे कारखानासह दुहेरीकरणालाही विशेष गती हवी

सोलापूर - रेल्वे अर्थसंकल्पात विभागाच्या वाट्याला दरवर्षी येणारी निराशा व तुटपुंजा वाटा पाहता वर्षानुवर्षे मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याची सोलापूरकरांची भावना दाट आहे. राजकीय पाठपुरावा नसणे ही खंत सोलापूर विद्यापीठासह सोलापूर रेल्वे विभागाच्याही मनात खदखदत आहेच. त्या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या पोतडीतून सोलापूरकरांच्या वाट्याला काय येणार ? हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विभागातून पाच गाड्यांचा प्रस्ताव अर्थसंकल्पासाठी पाठविण्यात आला आहे. त्यात सोलापूर हावडा (कुर्डुवाडी - लातूर - परभणी मार्गे), सोलापूर अजमेर (दौंड कोपरगाव मनमाडमार्गे),सोलापूर नागपूर (कुर्डुवाडी लातूर परभणी मार्गे), कोल्हापूर हैदराबाद (पंढरपूर कुर्डुवाडी मिरजमार्गे) व लातूर मिरज या गाड्यांचा समावेश आहे. मात्र,  त्याशिवाय विजापूर-मुंबई-विजापूर ही आठवड्यातून चार दिवस असणारी पॅसेंजर दैनंदिन करावी, ही मागणी आहेच.

कुर्डुवाडी रेल्वे कारखान्यात ब्रॉडगेज डबे तयार व्हावेत, हा कारखाना सुरू राहावा, ही मागणी सातत्याने डावलण्यात येत आहे. यासाठी अर्थसंकल्पातून भरीव तरतूद होण्याची गरज आहे. दौंड ते वाडी दरम्यान 270 किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण बाकी आहे, यासाठी आशिया बॅंकेतून निधी उपलब्ध झाला आहे, मात्र वाढीव निधी देत हा प्रकल्प तातडीने मार्गी लावला जाणे अपेक्षित आहे. कारण या कामानंतरच आठशे कोटी रुपये खर्चाचे विद्युतीकरण प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.

पंढरपूर-मुंबई दैनंदिन व्हावी
पंढरपूर-मुंबई तीन दिवस आहे, ती दैनंदिन करावी, ही प्रमुख मागणी आहे. पंढरपूर-मिरज हा ट्रॅक सुरू झाला मात्र या मार्गावरील पंढरपूर कुर्डुवाडी नियमित धावणाऱ्या सोयीच्या काही गाड्या बंद करण्यात प्रशासनाने काय डाव साधला हे समजत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या गाड्या पूर्वीसारख्याच सोडण्यात याव्यात, ही मागणी आता नव्याने होत आहे. पंढरपूर लोणंद मार्ग हा तर रेल्वेने केलेला सर्वात मोठा विनोदच आहे की असे वाटू लागण्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे, मार्गाचे केवळ सर्वेक्षण झाले आहे, या बाबतीतही राजकीय पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे मत पंढरपूरवासीयांतूनही होत आहे.

बार्शीकरांच्या मागण्या प्रलंबितच
ब्रॉडगेज मार्गावरील बार्शी मालवाहतुकीतील महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे मालधक्का तातडीने उभे करण्याची मागणी आहे. याचबरोबर स्टेशन लांब पडत असल्याने आरक्षण सेंटर शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू व्हावी, अशी मागणी आहे. वैराग परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बार्शी सोलापूर रोडवरील राजन मिलजवळ नव्याने रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी आहे. स्टेशन लांबवर असल्याने सिटी बस सोडण्यात यावी, शेअर रिक्षा अशा काही मागण्या स्थानिक स्तरावर मांडण्यात येतात.

रेल्वे अर्थसंकल्पात नव्या गाड्या सुरू व्हाव्यात, अशी मागणी सातत्याने होतेच. ते राहिले बाजूला उलट पंढरपूर कुर्डुवाडी या मार्गावरील सोयीच्या सर्व गाड्या बंद करून रेल्वे प्रशासनाने असुविधाच केली आहे. त्या गाड्या पूर्ववत सुरू व्हाव्यात.
- महावीर शहा ,सचिव, सोलापुर पुणे प्रवासी संघटना

Our Team

सोलापूर पुणे प्रवासी संघटना   अध्यक्ष Call : 97674 73255   Call : 97307 85799
सोलापुर पुणे प्रवासी संघटना   सचिव WebSite Developer please Call - 99758 78801 email - solapurpune@yahoo.com                 
Items: 1 - 2 of 2

Poll

you like our website?

Total votes: 643

Contact

अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे "हॉटेल अथर्व" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com
solapur pune pravasi sangatana