लातूर-कुर्डुवाडी रेल्वेमार्गाला प्राधान्य देऊ’

08/11/2011 18:13
परभणी: लातूर-कुर्डुवाडी रेल्वेमार्गाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही रेल्वेचे विभागीय प्रबंधक ए. के. प्रसाद यांनी दिली.  मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटना व वारकरी मंडळाच्या शिष्टमंडळाने सोलापूर विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना निवेदन दिले. त्या वेळी विभागीय प्रबंधक ए. के. प्रसाद यांनी ही

ग्वाही दिली.

 निवेदनात पंढरपूर रेल्वेला कार्तिकी एकादशी यात्रेअगोदर बर्थ सुविधेसोबत दोन अतिरिक्त डबे वाढवावे, सोयी-सुविधा व सुरक्षा द्याव्यात,  परभणी येथे रेल्वे पाच मिनिटे थांबवावी, पंढरपूरहून येताना कुर्डुवाडी-परळी स्थानकाचा लूज टाइम रद्द करून सकाळी 6 ऐवजी सकाळी 9 करावा, पंढरपूरहून त्या रेल्वे प्रस्थानाची वेळ निर्धारित करावी, पंढरपूरसाठी आणखी एक नवीन रेल्वे सुरू करावी, नांदेड-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वेला दैनंदिन करून गंगाखेड, पानगाव व बार्शी येथे थांबा द्यावा, परळी ते लातूर रोड दरम्यानचा लूज टाइम रद्द करावा आदी मागण्या करण्यात आल्या.

solapur pune pravasi sangatana