रेल्वेच्या धडकेत टिपरचालक जखमी

12/01/2012 17:21
बार्शी। दि. 10 (प्रतिनिधी)
श्रीपतपिंपरी फाटय़ावरील रेल्वे गेटजवळ मुंबई-लातूर या सुपर फास्ट रेल्वेच्या धडकेत टीपरचालक सतीश रामहरी ताकभाते (वय-47, रा. श्रीपतपिंपरी, ता. बार्शी) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे 5 वाजता घडला.
क्र.एम.एच.13 ए.एक्स.206 या टीपरचा चालक आज पहाटे नेहमीप्रमाणे पहाटे वाळू भरून आणण्यासाठी निघाला होता. रेल्वे गेटजवळ येत असताना शेंद्रीकडून येणा:या रेल्वे इंजिनच्या शिट्टीचा आवाज आला नाही शिवाय इंजिनची लाईट दिसली नाही. त्यामुळे चालकाने टिप्पर गेटमध्ये नेले, तेव्हा अचानक रेल्वे आल्याने जबर धडक बसल्याने दोन तुकडे उडाले. टिप्पर चालकाची केबीन 200 फूट अंतरावर फरफटत जाऊन आदळली. तर दुसरा भाग 1 हजार फूट अंतरावर जाऊन पडला. निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी अपघात झाल्याने टायरचा फुटून मोठा आवाज आला. आवाजामुळे स्थानिक गावकरी जमा झाले. रेल्वे कर्मचारी आनंद जेऊरकर यांनी वॉकीटॉकीवरून शेंद्री रेल्वेस्टेशन मास्तर ओमप्रकाश कृष्णन यांना माहिती दिली. त्यांनी रेल्वेच्या अधिका:यांना माहिती दिली. जखमी चालकास गावक:यांनी बार्शी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर थांबलेली रेल्वे शेंद्री रेल्वे स्टेशनवर नेण्यात आली. वैरागचे पोलीस उपनिरीक्षक सुनील रोहकले यांनी भेट देऊन पंचनामा केला. रेल्वेचे यादव, मंडल सिग्नल इंजिनिअर पी.व्ही. जगताप, वरिष्ठ मंडल संरक्षण अधिकारी ब्रिजमोहन तिवारी, कुडरूवाडी निरीक्षक एच.पी. गुप्ता, वाणिज्य निरीक्षक विश्वजीतसिंग यांनी घटनास्थळाला भेट दिली.

 


solapur pune pravasi sangatana