सुटी घेऊन एसटी कर्मचार्‍याचे उपोषण

19/12/2011 17:31

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज दिवसभर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे राज्यातील आगारात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. विशेष म्हणजे, सुट्टी घेऊन कर्मचारी आगारात उपोषणाला बसले होते.

सरकारने कर्मचार्‍यांच्या प्रश्नाविषयी अंतिम तोडगा दिवसभरात काढला नसल्याने कर्मचारी उद्या बेमुदत संपावर जाण्याची शक्यता आहे.

त्याचा फटका एसटीच्या लाखो प्रवाशांना बसून सेवा कोलमडण्याची चिन्हे आहेत.

अशा आहेत मागण्या?

- एसटीतील कर्मचार्‍यांना कनिष्ठ वेतनश्रेणी कामगारांप्रमाणे समान वेतन देण्यात यावे.

- अन्य राज्यांप्रमाणे एसटीचा प्रवासी कर १७.५ टक्क्यांऐवजी ७ टक्के करण्यात यावा.

- एसटीला पथकरापासून वगळण्यात यावे, चालक व वाहकांच्या विश्रांतीची वेगळी सोय उपलब्ध करण्यात यावी.

- प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार बसेस व मनुष्यबळ वाढवावे.

- न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे राज्यातील खाजगी अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून सक्षम अंमलबजावणी करावी.

-कनिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यांना समान कामाप्रमाणे काम दिले पाहिजे. त्यासाठी सरकारने दरवर्षी १५0 कोटींची तरतूद करायला हवी.

सरकारकडून एसटीला १४00 कोटींचे येणे बाकी आहे, ते रोख स्वरूपात देण्यात आले तर कनिष्ठ वेतन कामगारांसोबतच एसटीच्या अन्य कर्मचार्‍यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. मात्र, एसटी प्रवाशांच्या प्रश्नांची चर्चा करायला सरकारला वेळ नाही, त्यासाठी हे उपोषणाचे अस्त्र उपसले आहे.


solapur pune pravasi sangatana