रेल्वे चौकशी आता फेसबुकवर

16/02/2012 11:04
मुंबई। दि. १३ (प्रतिनिधी)
टेक्नोसेव्हि लोकांपूर्तीच र्मयादीत न राहता सर्वसामान्यांचे आकर्षण ठरलेल्या फेसबुकवर आता चक्क रेल्वे तिकीटांच्या आरक्षणासह गाड्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. सध्या रेल्वेच्या दिल्ली विभागात प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू झाली आहे.
फेसबुक, ट्विटर या सोशिल नेटवर्किंग साईट्स वापर झपाट्याने वाढत आहे. हा वापर केवळ तरूण किवां तांत्रिकदृष्या प्रगत लोकांपूरता र्मयादित न राहता याची व्याप्ती सर्वसामान्यांमध्येही वाढत आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या फेसबुकच्या आकडेवारीनुसार भारतात ३ कोटी फेसबुक युझर आहेत. भारतीयांमध्ये फेसबुक वाढते आकर्षण लक्षात घेऊन रेल्वे कडून फेसबुकवर रेल्वे तिकीट आरक्षणाबाबतची माहिती उपलब्ध करण्यात येणार आहे. रेल्वेच्या दिल्ली विभागागाकडून ही सेवा प्रायोगित तत्त्वावर सुरू करण्यात आली असून लवकरच ती सर्वत्र उपलब्ध होईल.

काय होईल फायदा?
फेसबुकवरती रेल्वेची माहिती देण्यासाठी स्वतंत्र पेज अपलोड करण्यात येणार असून, हे पेज नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सर्व्हिस आणि डिपार्चर ऑफ ट्रेनच्या रेल्वेच्या संकेतस्थळावरील पेजशी जोडण्यात येणार येईल. त्यामुळे प्रवाशांना आपल्या तिकिटाच्या आरक्षणाविषयी संपूर्ण माहिती मिळू शकेल. याबरोबरच गाड्यांची उपलब्धता, वेळ व संबंधित
माहिती मिळू शकेल.

solapur pune pravasi sangatana