प्रवाशांना दररोज 50 कोटींचा चुना

27/12/2011 15:18
 
इंदोर - भारतीय माणसाला घरातून बाहेर पडल्यापासून ते पुन्हा घरी पोहोचेपर्यंत पाच वेळा फसवले जाते, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण परिषदेने हे सर्वेक्षण केले आहे. या रोजच्या फसवणुकीत सर्वांत मोठा हात (सुमारे 50 कोटी रुपये) रेल्वेतील पँट्रिकारचा आहे. त्याबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर रेल्वेचे सात पँट्रिकार कंत्राटदार बदलण्यात आले आहेत.

जादा दराने वसुली : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने नाष्टा व जेवणासाठी देशभरात सारखेच दर ठरवून दिले आहेत; मात्र ब-याच गाड्यांमध्ये यापेक्षा जास्त पैसे घेतले जातात.  शाकाहारी थाळीचे 22 ऐवजी 40 आणि शाकाहारी जेवणाचे 30  ऐवजी 45 रुपये वसूल केले जात  असल्याच्या

तक्रारी लोकांनी केल्या आहेत.

50 कोटींचे गणित : एका ट्रेनमध्ये 16 ते 24 डबे असतात. एका डब्यात 78 सीट. त्यानुसार एका ट्रेनमधून सरासरी 1872 लोक प्रवास करतात. देशभरात सुमारे 5 हजार गाड्यांमध्ये पँट्रिकार आहे. एका गाडीतील 1 हजार लोकांनी जरी पँट्रिकारमधून नाष्टा, दोन वेळा जेवण, एखादे पेय आणि पाण्याची बाटली घेतली तर त्यांना 100 रुपये जास्तीचे मोजावे लागतात. या हिशेबाने 5000 गाड्यांचा हा आकडा 50 कोटी रुपयांवर पोहोचतो.

हे आहेत जेवणाचे दर

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने शाकाहारी आणि मांसाहारी नाष्टा व जेवणाचे दर देशभरात एकसमान ठरवले आहेत.

शाकाहारी नाष्टा : 17 रु.

1. बे्रड स्लाइस - 2 नग, 10 ग्राम   लोण्यासोबत

टोमॅटो केचप- 15 ग्रामचा सॅशे, मीठ आणि मोहरी.

शाकाहारी कटलेट- 2 नग-

100 ग्राम.

2. इडली : (4 नग)-

200 ग्राम व उडीद वडा (4 नग)

120 ग्राम, चटणी- 50 ग्राम

3. उपमा- 100 ग्राम व उडीद वडा(4 नग)- 120 ग्राम, चटणी- 50 ग्राम

4. पोंगल- 200 ग्राम आणि उडीद वडा(4 नग)- 120 ग्राम,

चटणी- 50 ग्राम

(कुठल्याही एका प्रकारच्या नाष्ट्यासाठी ठरवलेला दर)

प्रवाशांनी मेनू कार्ड मागावे

* रेल्वेगाड्यांमध्ये एका दिवसांत प्रवाशांची 50 कोटींपर्यंत लूट केली जाते. या प्रकरणी पश्चिम रेल्वे कार्यालयात मुंबई येथे तक्रार करण्यात आली. त्यानंतर पश्चिम एक्स्पे्रस ट्रेनमधील पँट्रिकारच्या कंत्राटदारांना काढण्यात आले. यापूर्वीही 6 कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. प्रवाशांनी जेवणाची ऑर्डर देण्यापूर्वी मेनू कार्ड मागवून त्यानुसारच पैसे द्यावेत.

solapur pune pravasi sangatana