वैद्यकीय अधिका:याविना रेल्वे रुग्णालय

12/01/2012 17:19
दि.10 (नंदुरबार)
रेल्वे रुग्णालय युनिटमध्ये पुरेसा औषधसाठा असला तरी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रेल्वेतील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होतात. हा प्रकार सातत्याने गेल्या 13 वर्षापासून सुरू आहे. विशेष म्हणजे कायम वैद्यकीय अधिकारी नसल्याचा फटका रेल्वे कर्मचा:यांना बसला असून, आतार्पयत पाच बळी गेले आहेत. त्यातील एक बळी गेल्या महिनाभरातील आहे.
नंदुरबार रेल्वेस्थानक परिसरातच रेल्वेचे सुसज्ज रुग्णालय युनिट आहे. या ठिकाणी 1998 साली डॉ.बी.पी. सोपारकर नामक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीच नंदुरबारला मिळाला नाही.
नरडाणा ते नवापूर असे 14 रेल्वेस्थानकातील 95 किलोमीटर कार्यक्षेत्रात समाविष्ट असलेले रेल्वेतील 1125 कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय याशिवाय रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय असे जवळपास पाच हजार सदस्य या युनिटवर अवलंबून आहेत.
या ठिकाणी डॉ.सोपारकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर बाहेरगावहून वैद्यकीय अधिकारी निदान करण्यासाठी येतात. मात्र ते सर्व रेल्वेने दोन-दोन वर्षाच्या करारावर नियुक्त केलेले कंत्राटी पद्धतीचे वैद्यकीय अधिकारी. जे येतात ते आठवडय़ातून तीन दिवस किंवा जास्तीत जास्त आठवडाभर असतात. यानंतर पुन्हा नवीन वैद्यकीय अधिकारी येतात. असे हे फिरते चक्र सुरू असते.
तीन दिवस असलेल्या वैद्यकीय अधिका:यास रेल्वेच्या बाहेरगावच्या दवाखान्यातून बोलविणे आल्यास नंदुरबार युनिट सोडून दुसरीकडे जावे लागते. या काळात नंदुरबार युनिट पुन्हा बेवारस होते. हा प्रकार सातत्याने सुरूच असतो.
यादरम्यान एका वैद्यकीय अधिका:याने आधी काय उपचार केले आहेत, त्याचा रुग्णावर कितपत परिणाम झाला याची इत्थंभूत माहिती नव्याने येणा:या वैद्यकीय अधिका:यास येत नाही. यातून व्यवस्थित निदान होत नसल्याचे चित्र आहे. येथे किरकोळ आजारांव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या आजारांवर उपचार होत नाही.
कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याचा फटका रेल्वे कर्मचा:यांना बसला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दिलीप सपकाळे (वय 52) नामक रेल्वे कर्मचा:याचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला. ते रेल्वेच्या सिगAल विभागात इलेक्ट्रिकल सिगAल मेंटेनर म्हणून कार्यरत होते.
याबाबत माहिती घेतली असता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार रेल्वे रुग्णालयासाठी अजर्च करीत नसल्याचे चित्र आहे.
परिणामी रेल्वे प्रशासनही कायम वैद्यकीय अधिकारी देऊ शकत नसल्याची स्थिती आहे.
पश्चिम रेल्वेच्या भुसावळ-सुरत मार्गावर उधना, नंदुरबार व अमळनेर येथे रेल्वे रुग्णालय युनिट आहेत. यातील अमळनेर वगळता इतर दोन्ही ठिकाणी कायम वैद्यकीय अधिकारी नाही. सध्या अमळनेर येथे कायमस्वरूपी असलेले वैद्यकीय अधिकारीही निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर तेथेही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार आहे.
येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मुंबईत रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात पाठविले जाते.
पाच हजार सदस्य अवलंबून असलेल्या नंदुरबार रेल्वे रुग्णालय युनिटला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावा यासाठी रेल्वेतील संघटनांतर्फे आवाज उठविण्यात आला आहे.
मात्र रेल्वे प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचे चित्र आहे. आतार्पयत पाच बळी गेले. अजून किती जणांच्या मृत्यूची रेल्वे प्रशासन वाट पाहणार आहे, असा प्रश्न वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे शाखा सचिव चतुर सी. गिरासे यांनी उपस्थित केला आहे.

solapur pune pravasi sangatana