हैदराबाद-कोल्हापूर दरम्यान हिवाळ्यात 40 स्पेशल ट्रेन

04/11/2011 14:49
कोल्हापूर - हिवाळी सुटीत प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी जाण्यासाठी गर्दी होते. प्रवाशांची गैरसोय विचारात घेऊन मध्य रेल्वेने काही खास गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेबर ते 4 डिसेंबर दरम्यान हैदराबाद ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर); तर 3 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) ते हैदराबाद दरम्यान आठवड्यातून चार दिवस स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. स्पेशल ट्रेनचे बुकिंग आज (ता. 2) पासून कोल्हापूर रेल्वे स्थानकात सुरू केले आहे. मार्गावरील थांब्याच्या ठिकाणामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

हिवाळी स्पेशल ट्रेनचा तपशील
ट्रेन नं. प्रयाण आगमन

07143 हैदराबाद वेळ 23.10 वा. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) वेळ 22.45 वा. (दुसऱ्या दिवशी)

सेवेचे दिवस - नोव्हेंबर 1, 2, 5, 6, 8, 9, 12, 13, 15, 16, 19, 20, 22, 23, 26, 27, 29, 30; तसेच 3 आणि 4 डिसेंबर.

*07144 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) वेळ 7.30 वा. हैदराबाद वेळ 6.45 वा. (दुसऱ्या दिवशी)

सेवेचे दिवस - नोव्हेंबर 3, 4, 7, 8, 10, 11, 14, 15, 17, 18, 21, 22, 24, 25, 28, 29; तसेच 1, 2, 5 आणि 6 डिसेंबर.

solapur pune pravasi sangatana