लोकपाल मंजूर होईपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा अण्णांचा निर्धार

27/08/2011 12:04

नवी दिल्ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा रक्तदाब कमी झाल्याने एकीकडे डॉक्टर काळजीत असताना

खुद्द अण्णांनी मात्र अजून 4-5 दिवस उपोषण सहजपणे करू शकू असा विश्वास व्यक्त केला.

भ्रष्टाचार मुळापासून संपवण्यासाठी सशक्त लोकपाल विधेयकाची गरज असून ते मंजूर होईपर्यंत माझे उपोषण सुरुच

राहील असे ते म्हणाले. हे उपोषण मी माझ्या स्वार्थासाठी करत नसून देशाच्या हितासाठी करत आहे. त्यामुळे

मला काहीही होणार नाही. अजून 4-5 दिवसही मी उपोषण सुरू ठेऊ शकेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


अण्णांच्या उपोषणाचा आजचा 12वा दिवस असून त्यांच्या उपोषणाला 260तास उलटून गेले आहेत. त्यांचा रक्तदाब

कमी झाला असून त्यांच्या हार्टबीट्स वाढल्याने डॉक्टर काळजीत पडले आहेत.


solapur pune pravasi sangatana