रेल्वे वेळापत्रक बदलण्याची मागणी

23/09/2013 14:06
मिरज-कुडरुवाडी पॅसेंजर गाडी वगळता उर्वरित सर्व रेल्वेगाड्या सांगोलेकरांना सोईच्या नसून त्यांचे वेळापत्रकात सुधारणा करून बदल करावेत, अशी मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.

मिरज-कुडरूवाडी दरम्यान सध्या मिरज-कुडरूवाडी पॅसेंजर, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट, मिरज-परळी (पॅसेंजर) व कोल्हापूर-सोलापूर या रेल्वे गाड्यांची ये-जा होते. सध्या मिरज-कुडरूवाडी मिरजहून सकाळी ६ वाजता सुटते व कुडरूवाडी १0.३0 वाजता पोहचते. हीच सांगोलेकरांना सोईची गाडी आहे. बाकी सर्व गाड्यांचा प्रवसाच्या दृष्टीने कोणताही उपयोग नाही. मिरजहू सायंकाळी ६.२0 वाजता मिरज-पंढरपूर सुपरफास्ट रेल्वे धावते. मात्र, या देवाच्या गाडीस एस.टी. बस पेक्षा जादा भाडे आहे. तर सुपरफास्ट असूनही सर्वच थांब्यावर थांबते. मिरज-पंढरपूर हे अंतर १३0 कि.मी. आहे. नियमानुसार सुपरफास्ट गाडीस ५00 कि.मी.च्या आत थांबा व तिकिटही दिले जात नाही. मिरज-पंढरपूर दरम्यान ९ थांबे आहेत.

१ जुलैपासून दिवसा धावणार्‍या सोलापूर-कोल्हापूर व कोल्हापूर-सोलापूर या मध्यरात्रीच्या दरम्यान धावत असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने याचा कोणताही फायदा नाही. याच गाड्या जेव्हा दिवसा धावत होत्या तेव्हा सांगोला स्थानकावर ७0 ते ८0 प्रवासी दररोज प्रवास करीत होते. मात्र सध्या मध्यरात्री धावणार्‍या या गाड्या प्रवाशाविना तोट्यात धावत आहेत. याची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन वेळापत्रकात बदल करून प्रवाशांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने वेळापत्रकात बदल करावा, अशा मागणीचे निवेदन प्रवासी संघटनेने दिले आहे.

solapur pune pravasi sangatana