भंगार विक्रीतून रेल्वेला विक्रमी 351 कोटी
रेल्वेच्या वापरातून बाद झालेल्या ईएमयू रेक्स, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे, लोको यांच्यासह अन्य लोखंडी साहित्य पश्चिम रेल्वेच्या ठिक-ठिकाणच्या विभागात पडून होते. मुंबईतील महालक्ष्मी, गुजरातमधील साबरमती, बडोद्याजवळील प्रतापनगर, पंचमहल जिल्ह्यातील दाहोद येथील भंगार यावर्षी विकण्यात आले. सर्वाधिक भंगार दाहोद येथे होते. या भंगार विक्रीतून रेल्वेला 351 कोटी 75 लाखांचा फायदा झाला आहे. गतवर्षी भंगार विक्रीतून रेल्वेला 303 कोटी 40 लाख रुपयांचा फायदा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 12 टक्के जादा कमाई झाली आहे.
|