नागरकोईल एक्स्प्रेसवर दरोडा कुडरूवाडी-मोहोळदरम्यान दोन डब्यातील प्रवाशांवर हल्ला

05/11/2011 10:37

सोलापूर। दि. 4 (प्रतिनिधी)

मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस मलिकपेठ व वाकाव (मोहोळ) दरम्यान क्रॉसिंगसाठी थांबल्यानंतर दरोडेखोरांनी चार डब्यांमध्ये घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री 7.30 वाजता घडली. या गाडीमध्ये पोलीस बंदोबस्त नसल्याने प्रवासी संतप्त झाले. तब्बल सात वेळा चेन ओढूनही रेल्वे न थांबल्याने सोलापूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. यामुळे तब्बल दीड तास रेल्वेस्थानकावर गोंधळ सुरू होता. यावेळी सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी बळाचा वापर करून प्रवाशांना हुसकावून लावले. दरोडेखोरांच्या हल्ल्यात मुंबईतील व्यापारी जाफर अली यांच्यासह चार महिला जखमी झाल्या.
मुंबईहून दुपारी 12 वाजता कन्याकुमारीकडे नागरकोईल एक्स्प्रेस (क्र.16339) निघाली होती. कुडरूवाडी रेल्वेस्थानकावर सायं़ 6.58 वाजता थांबा घेऊन, ही गाडी सात वाजता पुढे मार्गस्थ झाली. वाकाव-मलिकपेठ(मोहोळ) या स्थानकावर क्रॉसिंगसाठी सायं़ 7.30 वाजण्याच्या सुमारास थांबली. याच वेळी दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक धाकवून डब्यांमधील महिलांच्या गळ्यातील दागिने लुटले. प्रवाशांनी विरोध करताच दगड व चाकूने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. प्रवाशांनी पाच-सहा वेळा गाडीची चेन ओढून रोखण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण गाडीमध्ये सुरक्षा बलाचा एकही जवान बंदोबस्तासाठी तैनात नव्हता.
ल्ल संतप्त प्रवाशांनी सोलापुरात रेल्वे रोखली
ल्ल रेल्वे सुरक्षा बलाचा प्रवाशांवर लाठीहल्ला
ल्ल गाडी रोखणा:या दोन प्रवाशांना ताब्यात घेतले
ल्ल पत्रकारांसमोर गा:हाणे सांगणा:या प्रवाशांना पोलिसांनी बदडले


solapur pune pravasi sangatana