माथेरान ट्रेन सज्ज

09/11/2011 13:49

नव्या पर्यटन हंगामासाठी नेरळ - माथेरान मिनी ट्रेन सज्ज झाली आहे . ब्रेक पोर्टरविना नॅरोगेजवर धावू शकेल अशी एअरब्रेक सिस्टिम कार्यान्वित करण्यात येणारे मिनी ट्रेनचे सहा डबे नेरळ लोको शेडमध्ये दाखल झाले आहेत . विशेष म्हणजे तंत्रज्ञांनी या मिनी ट्रेनचे डबे दार्जिंलिंग , सिमला , कुलु - मनाली , कालकाच्या धर्तीवर कुर्डुवाडी येथील वर्कशॉपमध्ये तयार केले आहेत .
१५ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नॅरोगेजवर धावणारी मिनी ट्रेन पावसाळ्यातील अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे बंद असते . या कालावधीत मिनी ट्रेनचे डबे दुरुस्त करणे , इंजिन दुरुस्त करणे , नॅरोगेज मार्गांची किरकोळ दुरुस्ती अशी कामे केली जातात . मिनी ट्रेनचे डबे या विश्रांतीच्या कालावधीत कुर्डुवाडी येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी नेवून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा आणले जातात . या वर्षी हे डबे सप्टेंबर २०११ मध्ये कुर्डुवाडीला नेले आहेत . १९ ऑक्टोबरपासून ही मिनी ट्रेन पुन्हा धावणार आहे .

Our Team

सोलापूर पुणे प्रवासी संघटना   अध्यक्ष Call : 97674 73255   Call : 97307 85799
सोलापुर पुणे प्रवासी संघटना   सचिव WebSite Developer please Call - 99758 78801 email - solapurpune@yahoo.com                 
Items: 1 - 2 of 2

Poll

you like our website?

Total votes: 297

Contact

अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे "हॉटेल अथर्व" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com
solapur pune pravasi sangatana