भंगार विक्रीतून रेल्वेला विक्रमी 351 कोटी

22/07/2011 15:34

 

मुंबई - रेल्वेच्या भंगारातून तब्बल 351 कोटी 75 लाख रुपयांची घसघशीत भर यावर्षी पश्‍चिम रेल्वेच्या तिजोरीत पडली आहे. 2009-10 च्या तुलनेत या वर्षी 48 कोटी रुपये जादा मिळाले आहेत, आजवरचा हा विक्रमी फायदा आहे, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेमार्फत देण्यात आली.

रेल्वेच्या वापरातून बाद झालेल्या ईएमयू रेक्‍स, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे, लोको यांच्यासह अन्य लोखंडी साहित्य पश्‍चिम रेल्वेच्या ठिक-ठिकाणच्या विभागात पडून होते. मुंबईतील महालक्ष्मी, गुजरातमधील साबरमती, बडोद्याजवळील प्रतापनगर, पंचमहल जिल्ह्यातील दाहोद येथील भंगार यावर्षी विकण्यात आले. सर्वाधिक भंगार दाहोद येथे होते. या भंगार विक्रीतून रेल्वेला 351 कोटी 75 लाखांचा फायदा झाला आहे. गतवर्षी भंगार विक्रीतून रेल्वेला 303 कोटी 40 लाख रुपयांचा फायदा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 12 टक्के जादा कमाई झाली  आहे.

भंगार विक्रीमुळे रेल्वेची अडलेली बहुमूल्य जागा खुली झाली असून भंगारातून कोट्यवधी रुपये रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले आहेत, असा दुहेरी फायदा झाल्याचे रेल्वेमार्फत सांगण्यात आले.


solapur pune pravasi sangatana