पंढरीत तीन लाख भाविक दाखल कार्तिकीनिमित्त प्रशासकीय, पोलीस यंत्रणा सज्ज; भाविकांचा मुखदर्शनावरच अधिक भर

05/11/2011 10:40

पंढरपूर। दि. 4 (प्रतिनिधी)
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी शुक्रवारी तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याने 'चंद्रभागेकाठी भाविकांची दाटी़़़' असे चित्र सध्या दिसून येत आहे.
6 नोव्हेंबर रोजी होणा:या कार्तिकी एकादशीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण व अन्य राज्यांतून भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. पायी दिंडय़ा, बसगाडय़ा, रेल्वे व खासगी वाहनांतून भाविक येत असल्याने चंद्रभागा वाळवंट, कराड नाका, अकलूज रस्ता, इसबावी, बाजार समिती परिसरात मोठी गर्दी झाली आहे. भाविकांनी राहुटय़ा टाकून निवा:याची व्यवस्था केली आहे. पाण्यासाठी नगरपालिकेचा आधार घेत आहेत. काही भाविक स्वत:च पाणी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था पाहत आहेत. चंद्रभागेत स्नान उरकून पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक नामदेव पायरीच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहेत. यामुळे चंद्रभागा वाळवंट, महाद्वार घाट, दत्तघाट, विप्रदत्त घाट, चंद्रभागा घाटावर भाविकांचा महापूर आला आहे. हातात टाळ, मृदंग, वीणा याबरोबर मुखी विठ्ठलनामाचा जयघोष करत हे भाविक दर्शनासाठी आतुर झाले आहेत.
चंद्रभागा वाळवंटावर राहुटय़ा उभ्या राहिल्याने त्याला लोकवस्तीचे स्वरूप आले असून, सर्वत्र दुकाने थाटली आहेत. खेळणी, बुक्का, तुळशीमाळ विक्रेत्यांनी परिसर फुलून गेला आहे. रेल्वेस्थानकावरून येणा:या भाविकांमुळे स्टेशन रोड, सावरकर पुतळा परिसर, शिवाजी चौक, चौफाळा, नाथ चौक, गांधी रोड व प्रदक्षिणा मार्गावर भाविकांचा जथ्था आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान दर्शनरांगेत 35 हजार भाविक असून, एकेरी रांग आहे. चार पत्राशेडमधील दर्शन रांगेत 50 हजार भाविक दर्शनासाठी उभे आहेत. चंद्रभागा वाळवंटात लाखभर तर मठ, धर्मशाळा, जनावर बाजार, मोकळ्या जागी भाविक वास्तव्यास आहेत. यात्रेच्या पाश्र्वभूमीवर व्ही. आय. पी. दर्शन बंद झाल्याने लवकर दर्शनरांग पुढे सरकत असून, यामुळे भाविकांना विठुरायाचे दर्शन लवकर होत आहे. सर्वात विशेष म्हणजे मुख दर्शनाचे अंतर कमी केल्याने भाविकांचा मुखदर्शन घेण्यावरच अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. यासाठी दर्शन मंडपात भाविकांची प्रचंड गर्दी होत असून, मंदिर समितीचे कर्मचारी, पोलीस अन्य स्वयंसेवकांमार्फत भाविकांना सहकार्य देण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री येणारच!
सध्या नगरपालिकेची निवडणूक लागल्याने आचारसंहिता जाहीर झाली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री शासकीय महापूजेसाठी येतील की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे.


solapur pune pravasi sangatana