little kid     

 

प्रवाशांचा न्यायह्क्कासाठी एक चळवळ

शब्दांनाही कोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात;
केवढं आपलं भाग्य असते जेव्हा ती आपली असतात.

 

सोलापुर पुणे प्रवासी संघटना स्थापना १९.०८.२००८ ला करण्यात आली. सोलापुर, पुणे, पंढरपूर,केम,कुर्डुवाडी,माढा ,मोहोळ,पास धारक व प्रवासी यांच्या अडचणी सोडवन्या करीता संघटना स्थापन करण्याचे मुख्य कारण आहे. रेलवे पशासन व प्रवासी याच्यात स्नमय साधणे हे महत्वाचे उद्दीष्ट होते ते आम्ही साध्य केले आहे.व यापुढे प्रवास्याच्या अडचणी सोडवन्याबाबत आम्ही कटीब्द आहोत. आमची संघटना प्रवाश्याची सुरशीतता व सुखाने प्रवास करता यावा याची सूचना देत असते व तसेच सामाजीत उपक्रम ही करत असते.

मागील आढावा

१.   २१. ०९. २००८ : सघटनेच्या शिस्टमंडळांनी विभागीय रेल्वे व्यावस्थापिका राजलक्षिमी रविकुमार याची भेट घेऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.त्यातील काही मागण्या मान्या झाल्या आहेत.
२.    १३ .१० .२००८  : पासधारकाचे नागरकोईल एक्सप्रस मध्ये तिकीट निरीक्षकाच्या गेरसमजुतीने  पासधारकाचे  पास काढून घेतले होते याबाबत सघटनेचे पदधिकारी व अध्यक्ष यानी  रेल्वेचे सहाय्यक वानिज्ज व्यवस्थापक मा मुकुद बोकेफोडेसाहेब याच्या बरोबर चर्चा केली व पासधारकाना होणार्‍या त्रासबाबत चर्चा केली याबाबत चर्चा यशस्वी होऊन त्यानंतर आजत गाजत पासधारक व्यवस्थित प्रवास करीत आहेत.
३. २३.१०.२००८ : दी. २३.१०.२००८ रोजी सघटनेच्या शिस्टमंडळांनी रेल्वे राज्य मंत्री नारायनभाई रथवा याची भेट घेऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.त्यातील काही मागण्या मान्या झाल्या आहेत.
४. १०.१२.२००८ : दि. २६.११.२००८ रोजी  झालेल्या दहशदवादी हल्लात शहीद झालेल्या जवानाना श्रधाजली वाहन्यात आली.
 
५. २३.०२.२००९ : सोलापूर -सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी  रेल्वे प्रशासनाने मुंबई-पुणे इंद्रायणी एक्‍स्प्रेस सोलापूर पर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या इंद्रायणी एक्‍स्प्रेसचे सघटनेचे अध्यक्ष संजयदादा टोनपे व पदधिकारी यानी कुर्डुवाडीत स्वागत केले व ही गाडी दररोज व कायम स्वरूपी व्हावी अशी मागनी करण्यात आली व ती  मागनी मजूर झाली आहे हे सांगण्यास आनंद होत आहे.
 ६. १५.०८.२००९ : दी. १८.०८.२००९ रोजी स्वाइन फ्लूचे २००० मास्क् वाटपचा कायक्रम सघटनेचे अध्यक्ष संजयदादा टोनपे व पदधिकारी याच्या तर्फे  कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर करण्यात आला.
 ७. २३.१२.२००९ : दी. २३.१२.२००९ रोजी सघटनेच्या शिस्टमंडळांनी रेल्वे सरव्यावस्थापक भारतभूषन मोदगिल याची भेट घेऊन  विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.त्यातील काही मागण्या मान्या झाल्या आहेत.
८ .  ०८.०३.२०१० : सघटनेच्या शिस्टमंडळांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक के स्वामीनाथन याची भेट घेऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.त्यातील काही मागण्या मान्या झाल्या आहेत त्यात विशेष पुणे सिकंदराबाद शताब्दीस कुर्डुवाडी येथे थाबा मीळला आहे.
 ९ .  ०१.०४.२०१०: सोलापूर -सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी  एक रेल्वे गाडी उपलब्ध होत आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे सिकंदराबाद शताब्दी स्पेशल/0163  /0164 सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला सुट्टीच्या कालावधीसाठी सुरु होणारी ही गाडी प्रवाशांच्या चांगला प्रतिसाद मिळाल्यास सलग पुढे सुरु राहण्याची शक्‍यता आहे. या नव्या गाडीमुळे सोलापूरच्या प्रवाशांना पुण्याबरोबरच सिकंदराबाद जाण्यासाठी आणखी एक थेट रेल्वे गाडी उपलब्ध झाली आहे.  ही गाडी ए.सी. असून पाच ए.सी. कोच आहेत. या   पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्‍स्प्रेसचे सघटनेचे अध्यक्ष संजयदादा टोनपे व पदधिकारी यानी कुर्डुवाडीत स्वागत केले व ही गाडी दररोज व कायम स्वरूपी व्हावी अशी मागनी करण्यात आली .
१०.    ०५.०७.२०१० पंढरपूर-कुर्डुवाडी गाडी- सोलापुर पुणे प्रवासी संघटना गाडी चालू राहण्यास सघटनेच्या शिस्टमंडळांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक के स्वामीनाथन याची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
११ .  १९.०७.२०१० : सघटनेच्या शिस्टमंडळांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक के स्वामीनाथन याची भेट घेऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.त्यातील काही मागण्या मान्या झाल्या आहेत.
१२.१९.०७.२०१०  सोलापुर-पुणे प्रवासी सघटने तफे हुतात्मा एक्सप्रेसचा वाढदिवस साजरा.
१३.२४.०७.२०१० सोलापूर-पुणे प्रवासी सघटने तर्फे श्री संजयदादा टोणपे यांचा कुर्डुवाडी रेलवे स्थानक सल्लागार समिती पदी निवड झल्या बद्दल सत्कार.
१४.१०.०१.२०११ सोलापूर-पुणे प्रवासी सघटनेच्या शिस्टमंडळांनी रेल्वे महाव्यवस्थापक याची भेट घेऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
१५.२८.०२.२०११ पंढरपूर-कुर्डूवाडी रेल्वेगाड्या सुरू ठवण्याची मागणी - आ. भालके यानानिवेदन सोलापूर-पुणे प्रवासी सघटनेच्या शिस्टमंडळांनी रेल्वे महाव्यवस्थापक याची भेट घेऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
१६.१५.०४.२०११ पंढरपूर-कुर्डूवाडी रेल्वेगाड्या सुरू ठवण्याची मागणी - ना.शरद्चंद्र पवार यानानिवेदन सोलापूर-पुणे प्रवासी सघटनेच्या शिस्टमंडळांनी  भेट घेऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
१७.०६.०३.२०११ सोलापूर-पुणे प्रवासी सघटनेच्या शिस्टमंडळांनी रेल्वे महाव्यवस्थापक कुलभूषण याची भेट घेऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले. लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. तसेच पंढरपूर-कुर्डूवाडी रेल्वेगाड्या सुरू ठवण्याची मागणी करण्यात आली.
१८. लातूर ते सोलापूर अशी विशेष रेल्वेगाडी १ एप्रिल पासून तीन महिन्यासाठी  सुरू  होत आहे. गाडी प्रवाशांच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याचे मत सोलापुर पुणे प्रवासी संघटना  सचिव महावीर शहा कुर्डुवाडी  यांनी व्यक्त केले संघटनाचे यश.
१९. दौड ते गुलबर्गा दरम्यान च्या रेल्वेमार्गाचा समावेश अर्थसंकल्पात केलो नाही. त्यामुळे केंद्र शासन या कामाला पैसे देवू शकत नाही परंतु अशियायी बॅंकेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध झाले आहेत. या पैशातून मोहोळ ते भिगवन या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरमाचे काम करण्यात येणारआहे. भिगवण ते गुलबर्गा या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम करण्यात येणारआहे. त्यामुळे ही कामे लवकरच पुर्ण होतील. हे काम रेल्वे कार्पोरेशन माध्यमातून करण्यात येणार आहे. रेल्वे दुपदरीकरणामुळे व विद्युतीकरणामुले रेल्वे गाड्यांची संख्या व थांबे वाढतील परिणामी कृषी औद्योगीक दळवळणातही मोठी वाढ होईल. अशियायी बॅंकेकडून रेल्वेच्या तीन प्रकल्पासाठी पैसे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे रेल्वेची विविध कामे लवकरच करावे यासाठी प्रयत्न .
२०. सोलापूर-पुणे प्रवासी सघटनेच्या शिस्टमंडळांनी रेल्वे महाव्यवस्थापक एस.के.जैन याची भेट घेऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले. लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. तसेच पंढरपूर-कुर्डूवाडी रेल्वेगाड्या सुरू ठवण्याची मागणी करण्यात आली.
२१. आमच्या मागणीनुसार सोलापूर-कोल्हापूर ही गाडी सुरू करण्यात आली. व ह्या गाडीस संगोला येथे थांबा देण्यात आला.
२२. कुर्डुवाडी - मिरज ही गाडी नूकतीच चालू करण्यात आली.
२३. अमरावती - पुणे हीगाडी कुर्डुवाडी मार्गे नुकतीच चालू करण्यात आली.

 

 

 

 


solapur pune pravasi sangatana