
नवेगाव राष्ट्रीय उद्यान
हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.
जंगलाचा प्रकार
हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारात मोडते.
भौगोलिक
उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे.
प्राणी जीवन
नवेगावचे उद्यान हे मुख्यत्वे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नवेगावच्या तळयात हिवाळ्यात हजारोंनी स्थलांतरित पक्षी येतात. यात विविध प्रकारची बदके, हंस, क्रौंच, करकोचे, बगळे, पाणकोंबडया, पाणकावळे इत्यादी. तळ्यात विविध प्रकारचे पाणथळी पक्षी बघायला मिळतात तर जंगलामध्येही विविध प्रकारचे झाडीझुडुपातील पक्षी पहावयास मिळतात. प्राणी जीवनात येथे वाघ, बिबट्या, अस्वल, तरस, सांबर, नीलगाय, रानगवा, रानडुक्कर, माकडे व वानरे तसेच विविध प्रकारचे साप आढळतात यात पट्टेरी मण्यार ही दुर्मिळ सर्पाची जात येथे आढळते. येथील सर्वात विशेष म्हणजे तलावात पाणमांजरे आढळतात. निसर्गसाहित्यीक मारुती चित्तमपल्ली यांनी पाणमांजरांवरती अभ्यास याच उद्यानात केला होता. तसेच येथे कधी कधी रानकुत्रीही आढळतात. त्यांचे वास्तव्य काही काळापुरते असते. उद्यानात सारस क्रौंचाची एक जोडी नेहेमी असते. विदर्भातील पक्षीअभ्यासकांनुसार महाराष्ट्रात केवळ येथील सारस क्रौंचाची वीण केवळ नवेगाव मध्ये होते.
कसे जाल
गाडिने नागपूर हून कोलकाताच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग ६ वर १२० किमीवर साकोली नावाचे गाव आहे. साकोलीवरुन नवेगाव येथे जाण्यासाठी फाटा आहे. साधारणपणे ३५- ४० किमीवर नवेगाव उद्यान आहे.
महाराष्ट्र राज्य परिवाहन मंडळाच्या साकोली हून नवेगावला जाण्यासाठी एस्.टी बसेस मिळतात. दिवसातून २ फेर्या असतात.
Our Team
सोलापुर पुणे प्रवासी संघटना
सचिव
WebSite Developer
please Call - 99758 78801
email - solapurpune@yahoo.com
Items: 1 - 2 of 2
Poll
New list
Contact
अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे
"हॉटेल अथर्व" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com