ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे ११६.५५ कि.मी. क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे ५०८.८५ चौ.कि.मी.क्षेत्र मिळुन संयुक्तपणे बनलेला आहे.एकुण क्षेत्र सुमारे ६२५ चौ कि.मी. आहे. नुकतेच,महाराष्ट्र शासनाने एका अधिसुचनेद्वारे,या प्रकल्पाच्या सभोवताल संरक्षित क्षेत्र(बफर झोन)निर्माण केले आहे.या प्रकल्पालगतचे सुमारे ११०१.७७ चौ.कि.मी. क्षेत्र त्यात येते.त्यामध्ये ७९ गावांचा अंतर्भाव आहे.मानव व वन्यप्राण्याचा संघर्ष टळावा असा त्यामागील हेतु आहे. या प्रकल्पासभोवताल अनेक कोळसा खाणी आहेत.तेथील उत्खननामुळे व करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे या क्षेत्राच्या पर्यावरणावर परिणाम होउ शकतो.

solapur pune pravasi sangatana