माळशेज घाट

 आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळूवार सरकणार्‍या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणं घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचं असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवं. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचं रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.
 

इथली खासीयत म्हणजे ’रोहित पक्षी’ फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बर्‍याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वत:च्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.

माळशेज घाटातल्या रेस्ट हाऊसच्या मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससे, घोरपड, मुंगुस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणार्‍या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलिकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.

तसेच खुबी फाट्याजवळच्या खिरेश्‍वर गावाजवळच्या तळ्यातसुद्धा पहायला मिळतात. मोठा ग्रुप करून आरडा करत गेल्यास सारे पक्षी लांब उडून जातात. शांतपणे, भडक कपडे न घालता दुर्बिणीने पहाण्यातच आनंद घेता येतो.

थिदबीचा धबधबा

पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल.

कल्याण माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावात रस्ता संपतो येथे हॉलिडे रिसॉर्ट झाले आहे. हॉटेलवर गाडी पार्क करून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल. स्थानिक वाटाड्या बरोबर असेल तर धबधब्यापर्यंत आपल्याला जाता येते.

पुण्याहून नाशिक रस्त्याने - चाकण - आळेफाटा - माळशेज घाट = १६० कि.मी

Our Team

सोलापूर पुणे प्रवासी संघटना   अध्यक्ष Call : 97674 73255   Call : 97307 85799
सोलापुर पुणे प्रवासी संघटना   सचिव WebSite Developer please Call - 99758 78801 email - solapurpune@yahoo.com                 
Items: 1 - 2 of 2

Poll

you like our website?

Total votes: 335

Contact

अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे "हॉटेल अथर्व" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com
solapur pune pravasi sangatana